drugs seized
drugs seizedsakal

Online Drugs Smuggling: ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे ड्रग्जची तस्करी! कोट्यवधींचा साठा जप्त

ऑनलाइन फूड डिलिव्हरी एपद्वारे एल.एस.डी. अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-१ ने पर्दाफाश केला आहे.

पुणे - ऑनलाइन फूड डिलिव्हरी एपद्वारे एल.एस.डी. अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-१ ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून एक कोटी १४ लाख रुपयांचा एल.एस.डी. अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे.

रोहन दीपक गवई (वय २४, रा. डीपी रोड, कर्वे पुतळा), सुशांत काशिनाथ गायकवाड, (वय २६, रा. रा. ननावरे चौक, बाणेर), धीरज दीपक ललवाणी (वय २४, रा. पिंपळे सौदागर), दीपक लक्ष्मण गेहलोत (वय २५, रा. सनसिटी रोड, आनंदनगर) आणि ओंकार रमेश पाटील (वय २५, रा. वाकड) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना बाणेर, सिंहगड रस्ता, पिंपळे सौदागर आणि वाकड परिसरातून अटक करण्यात आली. मुख्य आरोपी ओंकार पाटील आणि इतर आरोपींच्या ताब्यातून एक कोटी १४ लाख रुपये किमतीचे ४१ ग्रॅम ९८६ वजनाचे एल.एस.डी., दोन दुचाकी, मोबाईल आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी अमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲपचा वापर केल्याचे समोर आले आहे.

drugs seized
Pune News : एनएसएस अधिक लोकाभिमुख करणार; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, पोलिस अंमलदार विशाल शिंदे, योगेश मोहिते, मारुती पारधी, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर घोरपडे, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, संदीप शिर्के, राहुल जोशी, संदेश काकडे, नीतेश जाधव, सचिन माळवे, रेहाना शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

drugs seized
Water Supply : उपाय योजनांमुळे पुणे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत; महापालिकेचा दावा

आरोपींकडून डार्कनेटचा वापर

सर्व आरोपी सुशिक्षित असून, काहींनी बीबीए, बीसीए आणि एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. आरोपींनी अमली पदार्थाच्या तस्करी डार्कनेट संकेतस्क्षळाचा वापर केल्याची प्राक्षमिक माहिती मिळाली आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com