
पुण्यातील शास्त्रीनगर चौकात एका मद्यधुंद तरुणाने रस्त्यावर थेट अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या तरुणाने BMW गाडी थांबवून सार्वजनिक ठिकाणी अत्यंत वाईट वर्तन केले. या घटनेने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.