
रहिवाशांची झाली दाणादाण
कँटोन्मेंट: घरात, दारात , देवघरात, स्वयंपाक घरात सगळीकडेच सांडपाणीच सांडपाणी शिरल्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. कुठं झोपाव, कुठे अन्न शिजवावे, कुठ बसावं अशी एकूणच परिस्थिती ओढवल्याने कासेवाडीतील रहिवाशांची मनस्थिती संताप जनक झाली आहे.
भवानी पेठेतील कल्याणकर गिरणी शेजारी ३११ कासेवाडी येथे ड्रेनेज लाईन तुंबल्याने मैला पाणी थेट गल्लीबोळातून घरात शिरत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली. गेल्या तीन महिन्यांपासून हा त्रास अधून मधून होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी तर सलग चार ते पाच दिवस घरात ड्रेनेजचा साठलेला गाळ व दुर्गंधीयुक्त मैलापाणी वहिवाट असलेल्या गल्लीबोळातून थेट घरात शिरत आहे.