Pune Civic Negligence: पुण्यात बेमोसमी पावसानंतर धुळीचे लोट, रस्त्यावर खडी-मातीचा ढिगारा; महापालिका, ठेकेदारांच्या निष्क्रियतेने नागरिक हैराण

Unseasonal rain leaves Pune roads dusty and gravel-strewn, residents suffer; बेमोसमी पावसानंतर रस्त्यांवर साचलेली माती-खडी, उडणाऱ्या धुळीने पुणेकर हैराण; महापालिका, ठेकेदार आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त
Accident Prone Roads: Loose Gravel and Sand on Key Arteries Lead to Two-Wheeler Skids

Accident Prone Roads: Loose Gravel and Sand on Key Arteries Lead to Two-Wheeler Skids

Sakal

Updated on

पुणे ः पावसाचा जोर ओसरताच शहरभर धुळीचे लोट उडत असून नागरिकांचा श्वास घुसमटतोय; डोळे जळजळत आहेत, तोंडात माती जात आहे आणि खडीवरून दुचाकी घसरून अपघात होत आहेत. पाच हजार कर्मचारी आणि स्विपिंग मशिन असूनही रस्ते साफसफाईचा पत्ता नाही. महापालिकेची झाडणकाम करणारी यंत्रणा, ठेकेदार अक्षरशः बेजबाबदारपणे वागत असल्याने पुणेकर संतप्त झाले आहेत.

शहरात बेमोसमी पावसामुळे दाणादाण उडाली. तासाभरात झालेल्या पावसामुळे शेकडो ठिकाणी पाणी तुंबले. हा पाण्याचा निचरा होण्यासाठी अर्ध्यातापासून ते दोन तासापर्यंतचा कालावधी लागला. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन संपूर्ण शहर ठप्प झाल्यासारखी स्थिती होती. या मुसळधार पावसामुळे अवघ्या काही मिनिटात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आले होते. चौकाचौकात तळे निर्माण झाले होते. यावेळी पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने त्यासोबत कागद, प्लास्टिक, चिंध्यांच्या कचऱ्यासह माती, खडी, वाळूही वाहून आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com