

Pune's First 'Gold Recovery Lab' to Extract Valuable Metals
Sakal
पुणे : शहरात वाढत्या ई-वेस्टच्या पार्श्वभूमीवर आता त्यातून मौल्यवान धातू काढण्याचा अनोखा प्रयोग सुरू झाला आहे. शहरात सुरू करण्यात आलेल्या ‘गोल्ड रिकव्हरी लॅब्स’ या नव्या प्रकल्पामुळे ई-कचऱ्याचा पुनर्वापर केवळ पर्यावरणपूरक न राहता आर्थिकदृष्ट्याही लाभदायी ठरत आहे. जवळपास एक टन ई-वेस्टवर प्रक्रिया करून सुमारे ३० ते ४० ग्राम शुद्ध सोने आणि आठ ते १० किलो तांबे काढले जात आहे.