
पुणे : पुण्याच्या पूर्व भागाचे प्रवेशद्वार असलेल्या वाघोलीची लोकसंख्या पाच लाखांपेक्षा अधिक आहे. कटकेवाडीतून महापालिका हद्द सुरू होते. महापालिका हद्दीत प्रवेश करताच कचरा आणि पावसाळ्यात महामार्गालगत पाणी साचलेले दिसते. कटकेवाडी ते बी. जे. एस. शैक्षणिक संकुलापर्यंत (बकोरी फाटा) वाहतूक सुरळीत असते. ‘बी. जे. एस.’पासून कोंडीला सुरुवात होते.