

Pune Economic Region development plan targets investment, jobs and sustainable urban growth by 2036.
esakal
पुणे: आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३६ पर्यंत २०० ते २२० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ५८ प्राधान्य प्रकल्प, नऊ ते दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगारनिर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, परवडणारी घरे उपलब्ध करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे, ही या आराखड्याची प्रमुख उद्दिष्टे आहेत. २०३६ पर्यंत सुमारे ९० टक्के पात्र कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.