
पुणे : कोरियाच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशनच्या (एनआयआयईडी) वतीने ‘टोपिक’ परीक्षेसाठी बालेवाडीमधील यूथबिल्ड फाउंडेशनच्या आवारातील इंडो- रियन सेंटरला (आयकेसी) अधिकृत टोपिक संस्था आणि परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे, अशी माहिती इंडो कोरियन सेंटर आणि किंग सेजोंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. एउन्जु लिम आणि इंडो कोरियन सेंटरचे सहसंस्थापक संजीब घटक यांनी पत्रकार परिषदेत दिली.