

Pune Traffic Police have announced temporary traffic diversions and parking restrictions
esakal
Pune Traffic Changes: ईद-ए-मिलाद निमित्त नाना पेठ परिसरातून २६ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. मिरवणुकीच्या मार्गावर तसेच त्याला जोडणारे उपरस्ते आणि गल्लीच्या आतील बाजूस १०० मीटर अंतरापर्यंत कोणतेही वाहन पार्क करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकीच्या काळात परिस्थितीनुसार वाहतूक मार्गात आवश्यक बदल केले जातील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.