Eknath Shinde: पुण्यात शिंदे गटाचं 'मेगा भरती'चं नियोजन; पक्षविस्तारासाठी तयारी सुरू

nanded ranjit singh kamthekar opposes shield and sword symbol given to eknath shinde balasahebanchi shivsena
nanded ranjit singh kamthekar opposes shield and sword symbol given to eknath shinde balasahebanchi shivsenaesakal

पुणे - राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे पक्षविस्तारासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी नियोजन सुरू केलं असून पुण्यात पक्षविस्तारासाठी शिंदे गटाकडून मेगा भरती होणार आहे. पुण्यात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी अनेकांना गळाला लावण्याचे प्रयत्नही सुरु झाले आहेत. (EknaTh Shinde news in Marathi)

nanded ranjit singh kamthekar opposes shield and sword symbol given to eknath shinde balasahebanchi shivsena
Nagpur: फडणवीसांच्या नागपूरमध्येच भाजपला धक्का; 13 पैकी 9 पंचायत समित्या काँग्रेसकडे

एकनाथ शिंदे गटात मनसेसह काँग्रेस आणि इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीतच पुण्यात पक्ष प्रवेश होणार आहे.

शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर पुण्यात एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काही पदाधिकारी गेले आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांना पक्ष वाढीसाठी आणखी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे पक्षविस्तारासाठी शिंदे गटाने नियोजन केल्याचं दिसून येत आहे.

nanded ranjit singh kamthekar opposes shield and sword symbol given to eknath shinde balasahebanchi shivsena
Accident Video: 'आज चारो मरेंगे' म्हणत बीएमडब्ल्यू पळवली २३०च्या वेगाने; पुढे जावून...

दरम्यान मनसे आणि काँग्रेस पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे आपल्या पक्षात घेणार असल्याचं समजतं. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचे डिसेंबर महिन्यात होणार उद्घाटन आहे. त्याचवेळी गणेश कला क्रीडा मंच येथे पुण्यातील अनेक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. एकूणच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मनसेसह अनेक राजकीय पक्षांना गळती लागणार हे स्पष्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com