

Incident at Warje Malwadi: Polling Process Obstructed
पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राकडे जाणारा रस्ता अडवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार वारजे माळवाडीतील पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक विद्यामंदिराजवळ गुरुवारी (ता. १५) घडला. याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई बालाजी काटे यांनी फिर्याद दिली आहे.