

Pune Election 2026
esakal
कात्रज : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कात्रज येथील सर्व्हिलंन्स स्कॉड टीमने (एसएसटी) नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई केली आहे. कात्रज जंक्शन येथील एसएसटी नाकाबंदी पॉईंटवर तपासणीदरम्यान टोयोटा हायरायडर चारचाकी वाहनातून तब्बल ६७ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.