Pune : भारती विद्यापीठ परिसरात १८ तास वीज गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Electricity pune

Pune : भारती विद्यापीठ परिसरात १८ तास वीज गायब

कात्रज : भारती विद्यापीठ परिसरातील फालेनगर, चंद्रभागानगर, त्रिमुर्ती चौक आदी परिसरात तब्बल १८ तासापासून वीज गायब आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे विजेवाहिनीचा जोड तुटल्याने नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गायब झालेली वीज सायंकाळी सोमवारी चार वाजेपर्यंतही आलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांसह लघु-उद्योजकांना मोठ्या प्रमाणांत याचा फटका बसला.

या खंडित परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असल्याने महावितरण विभागाने तातडीने लक्ष घालून अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तब्बल अठरा तास वीज ब्रेक झाल्याने वीज गेल्यास मोठ्या इमारतीत लिफ्टचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवतो. नागरिकांना जिन्याने चढ-उतार करावी लागते. तसेच पाणी मोटारीने पाणी वर चढविता येत नाही.

केवळ याच भागात विजवाहिनीची जोड तुटल्याने ही अडचण निर्माण झाली. वीजवाहिनीचा जोड तुटल्यापासून आम्ही तो जोडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. वीजेची केबल तुटलेली जागा शोधण्यात वेळ गेला. पावसामुळे अनेकवेळा अशा समस्यांना सामोरे जावे लागत असून लवकरच विजपुरवठा सुरळित होईल अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिक्रिया

रविवारी ११ वाजल्यापासून वीज गायब आहे. सकाळपर्यंत येईल अशी आशा होती. मात्र वीजपुरवठा न झाल्याने रोजच्या कामांवर त्याचा परिणाम झाला. पाणी नाही, यांत्रिक उपकरणांची मदत नाही, यामुळे वेळेचा गोंधळ उडाला. माझे वर्क फ्रॉम होम सुरू असून एवढा वेळ वीज गायब होईल याची कल्पना नसल्याने गोंधळ उडाला. विजपुरवठा सुरळित कधी होईल याची माहिती फोनवरूनही मिळत नाही. त्याबद्दल महावितरणकडून योग्य मेसेजही येत नाहीत. पहाटे

साडेचारला पुरवठा सुरळित होईल असा मेसेज आला होता, तो चूकीचा ठरला. ज्यांच्या घरी वयोवृद्ध किंवा रुग्ण आहेत त्यांची खूप गैरसोय होत आहे. - अर्चना सारडा, स्थानिक महिला

Web Title: Pune Electricity Katraj Bharti University Power Outage For 18 Hours

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..