Pune Municipal Commissioner Navalkishor Ram during a review of the anti-encroachment drive.
esakal
पुणे : ‘‘शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे तसेच बेकायदा फ्लेक्सविरुद्धच्या कारवाईमध्ये चढ-उतार होतील, पण कारवाई थांबणार नाही, याउलट यापुढे ही कारवाई अधिक गतीने होईल. ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार नाही, तिथे मी स्वतः कारवाई करणार आहे,’’ अशा शब्दांत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी ठणकावून सांगितले. आयुक्तांच्या या कडक इशाऱ्यामुळे अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे व फ्लेक्सबाजी करणाऱ्यांविरुद्धच्या कारवाईला आणखी धार चढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.