पुणे : अतिक्रमण कारवाई करताना पोलिस ठाण्यातील निम्मेच पोलिस बंदोबस्तावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police-Bandobast

धानोरी भागात कारवाई करत असताना महापालिकेच्या पथकावर जमावाने हल्ला केला, त्यामध्ये एका कर्मचाऱ्यास बेदम मारहाण करण्यात आली.

पुणे : अतिक्रमण कारवाई करताना पोलिस ठाण्यातील निम्मेच पोलिस बंदोबस्तावर

पुणे - अतिक्रमण (Encroachment) कारवाई (Crime) करताना महापालिकेच्या पथकावर हल्ला (Attack) झालेला असताना पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) पोलिस ठाण्यातील निम्मे पोलिस सुट्टीवर असून, ५२ पैकी सुमारे २७ ते २८ पोलिसच बंदोबस्तावर (Bandobast) असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेने अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग व आकाशचिन्ह विभाग यांची संयुक्त कारवाई शहरात सुरू केली आहे. त्यामध्ये सामाईत अंतरावरील अतिक्रमणांसह पादचारी मार्ग, रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात आहे. गेल्या १० दिवसांपासून कारवाई सुरू असून, आत्तापर्यंत सुमारे २ लाख चौरस फुटावरील अतिक्रमण काढून टाकेल आहे.

धानोरी भागात कारवाई करत असताना महापालिकेच्या पथकावर जमावाने हल्ला केला, त्यामध्ये एका कर्मचाऱ्यास बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाने खास महापालिकेसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू केले आहे. तेथे सध्या ५२ जणांची नियुक्ती आहे. पण आजारपण व इतर कारणांमुळे निम्मेच पोलिस उपस्थित असतात. त्यामुळे कारवाईला पुरेसा बंदोबस्त मिळत नाही.

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘महापालिकेच्या पोलिस ठाण्यातील निम्मे पोलिस रजेवर आहेत. त्यामुळे अतिक्रमण कारवाई करता पुरेसा बंदोबस्त मिळत नाही. पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असताना अशा स्थितीत पुरेसा बंदोबस्त मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे.

गुन्ह्यातून पतीला वगळले

धानोरी येथील कारवाईत महापालिकेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका माजी नगरसेविकेच्या पतीनेही धक्काबुक्की केल्याचे स्पष्ट दिसत आहे. पण त्यांना वगळून इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करतानाही महापालिका प्रशासनावर दबाव आणल्याची चर्चा आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पोलिसांची चर्चा केली जाईल असे सांगितले.

Web Title: Pune Encroachment Crime 50 Percent Police Bandobast On Duty

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..