Pune News: पुण्यात रोज अतिक्रमणांवर हातोडा! ;पुढील दोन महिने कारवाई करण्याचा महापालिका आयुक्तांचा इशारा

Pune Encroachment Removal Drive : पुणे शहरातील अतिक्रमणांविरोधात पुढील दोन महिने दररोज कारवाई होणार असून फ्रंट मार्जिन आणि पदपथ मोकळे करण्यासाठी महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
Pune Municipal Corporation's encroachment removal drive to clear footpaths and roads across the city.

Pune Municipal Corporation's encroachment removal drive to clear footpaths and roads across the city.

esakal

Updated on: 

पुणे : शहरातील अतिक्रमणांविरोधात नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर व हेतूवर प्रश्‍न उपस्थित केल्याने आता आयुक्त नवल किशोर राम यांनी पुढील दोन महिने शहरात रोज अतिक्रमण कारवाई केली जाईल, असे जाहीर केले. गरीब असो की श्रीमंत, राजकीय असो की अन्य कोणी सर्वांच्या अतिक्रमणांवर कारवाई करणार आहे. तसेच फ्रंट मार्जिन व पादचारी मार्गावरील अतिक्रमणे काढून टाकल्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न किमान २५ टक्के कमी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...