

वडके, आठल्ये, तांबोळी संयुक्तरीत्या आघाडीवर
पुणे, ता. १९ ः कर्वेनगरच्या मराठवाडा मित्रमंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित पुणे शहर विभागाच्या महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष विभागात सहाव्या फेरीअखेर सुयोग वडके, वरद आठल्ये आणि सोहेल तांबोळी हे तिघेही प्रत्येकी साडेपाच गुण मिळवून संयुक्तरीत्या आघाडीवर आहेत.
कर्वेनगर येथील मराठवाडा मित्रमंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय (एमएम सीओई) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या पटावर सुयोग वडके आणी वरद आठल्ये यांच्यातील लढत बरोबरीत सुटली, तर तिसऱ्या पटावर सोहेल तांबोळीने ओंकार सावर्डेकरला हरवून आघाडी संपादली.
सहाव्या फेरीचे काही निकाल असे ः
सुयोग वडके (५.५ गुण, एम एम सीओई) बरोबरी विरुद्ध वरद आठल्ये (५.५ गुण, पीव्हीजी सीओईटी ॲण्ड एम), अर्श कुलकर्णी (५ गुण, सिंबायोसिस कला व वाणिज्य कॉलेज) बरोबरी विरुद्ध अन्मय चव्हाण (५ गुण, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी), सोहेल तांबोळी (५.५ गुण, एम सीओई) वि.वि. ओंकार सावर्डेकर (४ गुण, एआयएसएसएमएस आयओआयटी), आर्यन जाधव (५ गुण, एआयएसएसएमएस आय सीओई) वि.वि. आशिष संकलेचा (४ गुण, व्हीआयटी), अनिश जोशी (५ गुण, पीव्हीजी सीओइटी अँड एम) वि.वि. अभय वणवे (४ गुण, स.प. कॉलेज).
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.