

खळद, ता. १९ : पुणे जिल्हास्तरीय निबंधलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि ‘चॉक अँड टॉकच्या पलिकडे’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. शिवरी (ता. पुरंदर) येथील महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय व शंकरराव मुगुटगराव कामथे कनिष्ठ महाविद्यालयाच्या (विज्ञान) माजी विद्यार्थी संघातर्फे हा कार्यक्रम सासवडमधील इस्काॅन भवन येथे झाला.
माजी विद्यार्थी संघातर्फे पाच वर्षांपासून वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी पुस्तक वाचनावर आधारित प्रश्नमंजुषेचा उपक्रम राबवला जातो. यावर्षी शिक्षकांच्या शैक्षणिक अनुभवावर आधारित निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला जिल्ह्यातील १०५ शिक्षकांनी सहभाग नोंदवला. यात २९ स्पर्धक विजेते ठरले. स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांच्या लेखांवर आधारित चाॅक अँड टाॅकच्या पलीकडे या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली होती. या पुस्तकाचे संपादन साधना नेतनकर, प्रमोद धायगुडे, तानाजी सातव व अविनाश जाधव यांनी केले असून परीस पब्लिकेशन सासवड हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
याप्रसंगी पुणे विभागाचे उपायुक्त (वस्तू व सेवा कर) योगेश नेतनकर, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, पुणे जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, प्रा. डॉ. नारायण टाक, पुणे विभागाच्या रयत शिक्षण संस्थेच्या सल्लागार समितीचे सदस्य शंकरराव कामथे, शिवरीचे शाळा समितीचे सदस्य बळवंतराव गरुड आदी उपस्थित होते. नवनाथ कामथे, मच्छिंद्र कामथे, अविनाश जाधव यांनी संयोजन, मधुकर यादव यांनी सूत्रसंचालन, तर अविनाश जाधव यांनी प्रास्ताविक केले. तानाजी सातव यांनी आभार मानले.
स्पर्धेतील विजेते (अनुक्रमे क्रमांक विभागून)
शीतल अविनाश जाधव (शाळा दरडिगेवस्ती, राजगड), मनीषा गणेश म्हेत्रे (शाळा आडाचीवाडी, पुरंदर).
मंगल आप्पासाहेब कोकरे(वाघिरे विद्यालय सासवड), विकास दत्तात्रेय गायकवाड (शाळा वांगणीवाडी,राजगड). स्वाती रमेश जगताप (शाळा जेजुरी, पुरंदर), शरद शंकर राजिवडे (शाळा वाकांबे, भोर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.