खासदार राऊतांच्या विधानावर मुरलीधर मोहोळांची जोरदार कोपरखळी | Shivsena | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murlidhar Mohol

खासदार राऊतांच्या विधानावर मुरलीधर मोहोळांची जोरदार कोपरखळी

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना देशातल्या राजकारणातला सर्वात मोठा ब्रँड असल्याचे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानांवर विविध राजकारण्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, यावर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनीदेखील ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात त्यांनी राऊतांना जोरदार टोला लगावला आहे. (Pune Ex Mayor Murlidhar Mohol Criticize Sanjay Raut )

मोहोळ म्हणाले की, नुकत्याच झालेल्या चार राज्यातील निवडणुकांमध्ये पुरतं तोंडावर आपटल्यावरही? ब्रँड कसा काय मोठा? असा खोचक प्रश्न विचारत तुमचा ब्रॅंड तर फारच ‘कडक’ आहे ! ‘हर्बल’ आहे की काय? असा प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा: श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा; स्थानिक मीडियाची माहिती

तुमचीच पिसं गळणार : संजय राऊत

भ्रष्टाचार विरोधी लढण्याचं ढोंग करणाऱ्यांचा मुखवटा लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणार आहे. त्यामुळे उगाच फडफडू नका, तुमचीच पिसं गळणार आहेत असल्याचे राऊत म्हणाले. युवक प्रतिष्ठान, विक्रांत घोटाळ्यापेक्षाही मोठे घोटाळे समोर येतील, असे म्हणत. या सर्व प्रकरणांपासून लक्ष विचलित करण्यासाठी सोमय्यांसारखे महाशय खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. भ्रष्टाचाराचे मेरुमणी आणि सूत्रधार हेच आहेत त्यामुळे हे कसला भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करणार असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे.

Web Title: Pune Ex Mayor Murlidhar Mohol Criticize Shivsena Mp Sanjay Raut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top