पुणे : मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या कार्यकारिणीला मंजुरी नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Market-Yard

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या कार्यकारिणीला सहाय्यक धर्मादाय आयुक्त रेश्मा पुणसे यांनी तात्पुरती मंजुरी देण्यास नकार दिला.

पुणे : मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या कार्यकारिणीला मंजुरी नाही

पुणे - गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या कार्यकारिणीला सहाय्यक धर्मादाय आयुक्त रेश्मा पुणसे यांनी तात्पुरती मंजुरी देण्यास नकार दिला. निवडणुकीबाबत बदल अर्ज प्रलंबित असताना आणि विरोधकांनी निवडणुक प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप घेतले असल्यामुळे सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याने बदल अर्जाला तात्पुरती सुद्धा मंजुरी देणे योग्य होणार नसल्याचे मत नोंदविले आहे.

याबाबत माहिती देताना विरोधी गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार अमोल घुले म्हणाले, 26 डिसेंबर 2021 रोजी अडते असोसिएशनच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला. अनिरुद्ध भोसले यांचे पॅनेल विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दौलत हिंगे यांनी दिले. त्या आधारे भोसले गटाने सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे बदल अहवाल सादर केला. त्यास विलास भुजबळ, सतिश उरसळ, बाळासाहेब उरसळ, काकासाहेब भालेराव, अनिल घुले,राजेंद्र कोरपे, युवराज काची, अमित उरसळ, दिलीप खिरीड, राहुल कोंढरे यांच्या गटाने विधीतज्ज्ञ शिवराज कदम जहागिरदार यांचे मार्फत कॅव्हेट दाखल करून हरकत घेतली होती. बदल अर्जाची सखोल चौकशी होऊन निवडणुक प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराची दखल घेऊन बदल अर्ज फेटाळावा अशी विरोधी गटाने मागणी केली होती.

निवडणुकी नंतर कामकाज करण्यासाठी तात्पुरती मंजुरी मिळावी असा अर्ज भोसले यांचे गटाने सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना केला होता. त्यांवर सुनावणी होऊन पुनसे यांनी तात्पुरती मंजुरी सुध्दा नाकारण्याचा आदेश दिला आहे. विरोधी गटातर्फे बदल अहवालाविरुद्ध बाजू मांडताना शिवराज कदम जहागिरदार यांना अमित टकले व शुभम् नागणे यांनी सहाय्य केले.

विरोधी पॅनलने निवडणूकीच्या कामकाजावर धर्मादाय आयुक्तांकडे अक्षेप घेतला होता. तर आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे तात्पुरता स्विकृती बदल मागितला होता. मात्र तात्पुरत्या बदलास त्यांनी नकार देण्यात आला आहे. परंतु अध्यक्ष व सचिवांनी कामकाज करू नये, असे कोठेही म्हटले नाही. तसेच निवडणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाली आहे असे म्हटलेले नाही.

- अनिरूद्ध (बापू) भोसले, निवडून आलेले अध्यक्ष

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत चुकीचे प्रकार घडत होते. त्याच वेळी आम्ही अक्षेप घेतला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. निवडणुकीचा कालावधी 13 तासांचा असताना 12 तासाचेच चित्रीकरण उपलब्ध आहे. एकत्र चित्रीकरण अपेक्षित असताना तुकड्यात चित्रीकरण देण्यात आले. दुपारी 3.30 वाजता मतमोजणी सुरू होणार असल्याची घोषणा निवडणूक अधिकार्‍यांनी केली. सर्वांना बाहेर काढले. प्रत्यक्षात मात्र 5.30 वाजता मोजणी सुरू केली. त्या दोन तासात अनेक चुकीचे प्रकार घडल्याचा आमचा संशय आहे. त्यामुळे आम्ही कॅव्हेट दाखल केले होते.

- अमोल घुले, विरोधी गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार.

Web Title: Pune Executive Of Marketyard Agent Association Has No Approval Reshma Punase

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..