पुणे : देशातून १ हजार २२१ कोटींच्या मधाची निर्यात

भारतामधून सुमारे ८३ देशांमध्ये मधाची निर्यात होते.
honey
honey esakal

पुणे : भारत हा जगातल्या मधाची निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक असून, २०२१-२२ या वर्षात १ हजार २२१ कोटी रुपये किमतीच्या ७४ हजार ४१३ मेट्रिक टन मधाची निर्यात करण्यात आली आहे. भारतातून ५० टक्क्यांपेक्षा जास्त मध उत्पादन निर्यात केले जाते, अशी माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली.

भारतामधून सुमारे ८३ देशांमध्ये मधाची निर्यात होते. राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानांतर्गत (एनबीएचएम) १०२ प्रकल्पांना १३३ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर सरकारकडून लक्ष ठेवले जाते.

मधासह कृषी अन्न उत्पादनांच्या निर्यातदारांना ‘अपेडा’द्वारे प्रोत्साहनपर अर्थसाहाय्य दिले जाते. मध आणि अन्य मधमाशी-जन्य उत्पादनांबाबत नोंद ठेवण्यासाठी ‘मधुक्रांती’ ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे.

भारतातील मध उत्पादन स्थिती (वर्ष २०२१-२२) :

मधमाशी पालक १२ हजार ६९९

मधमाशांच्या पोळ्यांची नोंदणी १९.३४ लाख

मध उत्पादन १ लाख ३३ हजार २०० मेट्रिक टन

प्रमुख बाजारपेठा अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश, कॅनडा

मधाचे प्रकार मोहरी मध, निलगिरी मध, लिची मध, सूर्यफूल मध, पोंगमिया मध, बहु-वनस्पती हिमालयीन मध, बाभूळ मध, जंगली वनस्पती मध.

अर्थसाहाय्य : राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान अंतर्गत उद्योग मंत्रालय, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, एनडीडीबी, नाफेड आणि ट्रायफेड संस्था

- पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन प्रबंध संस्था (वॅम्निकॉम) येथे सहकारी मध प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com