

Externment Order Violation | Loni Kalbhor Police Action
esakal
लोणी काळभोर : पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला तरुण तडीपारीचा आदेश धुडकावून थेऊरमध्ये वावरताना आढळून आला. विशेष म्हणजे, त्याच्या कमरेला पाठीमागे लोखंडी कोयता खोचलेला असल्याचे पोलिसांच्या तपासणीत उघड झाले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी गुरुवारी (ता. २७) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास कारवाई करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.