Pune Crime : शिक्षण संस्थाचालकाला २५ लाखांची खंडणी मागणाऱ्यास अटक; आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी
Extortion Case : पुण्यात शिक्षण संस्थाचालकाला त्यांच्या मुलाचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन २५ लाखांची खंडणी मागितली गेली. सिंहगड रस्ता पोलिसांनी पाच तासांत आरोपीला अटक केली.
पुणे : नामांकित शिक्षण संस्थाचालकास त्यांच्या मुलाचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन २५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, सिंहगड रस्ता पोलिसांनी खंडणी मागणाऱ्यास पाच तासांच्या आत अटक केली.