Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

Extortion Case : नाना पेठेतील जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५ कोटी ४० लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत आहे. या प्रकरणात त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Bandu Andekar arrested by Samarth Police in a major extortion and land encroachment case

Bandu Andekar arrested by Samarth Police in a major extortion and land encroachment case

Sakal

Updated on

पुणे : नाना पेठेतील एका जमिनीचा बळजबरीने ताबा घेऊन त्यावर बेकायदा बांधलेल्या इमारतीत भाडेकरू ठेवून पाच कोटी ४० लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी कुख्यात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने बंडू आंदेकरला २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी भवानी पेठेतील एका व्यावसायिकाने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com