

Wife refuses divorce after taking Rs 6.5 lakh alimony!
परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरवून पोटगीची साडेसहा लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्यानंतर ऐन वेळी पत्नीने 'यू-टर्न' घेत घटस्फोटास नकार दिला. त्यामुळे मोठ्या कायदेशीर पेचात अडकलेल्या पतीला पुणे कौटुंबिक न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयांचा आधार घेत न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला असून, पत्नीला तडजोडीतील अटींचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.