

पुणे, ता. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत जिल्ह्यातील पात्र १४ हजार २०७ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. ६४ हजार ६५५ पात्र लाभार्थ्यांपैकी आत्तापर्यंत ५० हजार ४४८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार ६५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण दौंड तालुक्यात पूर्ण झाले असून, त्यापाठोपाठ इंदापूरमध्ये नऊ हजार २३१ आणि बारामतीमध्ये आठ हजार ५७८ शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसरीकडे हवेली (१,००२), इंदापूर (१,८३१), दौंड (१,८८३), भोर (१,५१५) आणि खेड (१,०९४) तालुक्यांत मोठ्या संख्येने प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे, त्यांनी संबंधित बँक, सेवा केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अशी आहे स्थिती...
जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार, हवेलीमध्ये १,३५१, भोरमध्ये २,३०८, मुळशीमध्ये ५७३, मावळमध्ये १,३५२, खेडमध्ये २,२०८, शिरूरमध्ये ४,७२९, आंबेगावमध्ये १,३५१, इंदापूरमध्ये ९,२३१, राजगडमध्ये ४२९, जुन्नरमध्ये २,१५५, बारामतीमध्ये ८,५७८, पुरंदरमध्ये ३,१४३ आणि दौंडमध्ये १०,६५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. राष्ट्रीयकृत व इतर बँकांमार्फत २,३९७ लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, १,८४७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.