आधार प्रमाणीकरणातील अडथळा दूर

आधार प्रमाणीकरणातील अडथळा दूर
Published on: 

पुणे, ता. २० : वयोवृद्ध शेतकरी तसेच बोटांचे ठसे उमटत नसल्याने आधार प्रमाणीकरणात अडथळा येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत विशेष प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रातून तीन वेळा प्रयत्न करूनही प्रमाणीकरण न झाल्यास तालुकास्तरीय समितीमार्फत संबंधित शेतकऱ्याची ओळख निश्चित केली जाणार आहे.

ऑनलाइन प्रणालीद्वारे योजनेची अंमलबजावणी सुरू असून, महाआयटीमार्फत पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत १६ लाख ९६ हजार पात्र लाभार्थी आहेत. त्यापैकी १३ लाख ४८ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांमध्ये वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे उमटत नसलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणीकरण करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्यासाठी सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांना सूचना दिल्या आहेत.

तीन वेळा ठशांचा प्रयत्न
संबंधित शेतकऱ्यांनी यादीतील विशिष्ट क्रमांकासह जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रात आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जावे. विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांकाद्वारे कर्जाची माहिती पाहून मान्य अथवा अमान्य पर्यायाची नोंद केल्यानंतर बोटांच्या ठशांद्वारे प्रमाणीकरण केले जाईल. एका बोटाचा ठसा उमटला नाही, तर वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा लागेल. त्यानंतरही प्रमाणीकरण न झाल्यास सेवा केंद्र चालकाने ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर सेवा केंद्र चालकाच्या बोटाद्वारे पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

कागदपत्रांची पडताळणी
यानंतर संबंधित तक्रार ऑनलाइन पद्धतीने तहसीलदारांकडे पाठविली जाईल. शेतकऱ्याने तहसील कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुक, सात-बारा उतारा यांसह ओळख निश्चित करणारी कागदपत्रे सादर करावीत. तालुकास्तरीय समिती या कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित करेल. संबंधित व्यक्तीचा आधार क्रमांक योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर समिती तक्रार मान्य करेल. त्यानंतर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Farmers Loan Waiver News 1342 Beneficiaries Must Complete Aadhaar Authentication to Receive Eligible Loan Relief
Pune Farmer Loan Waiver News Third Beneficiary List Released 1718 Farmers From Pune District Eligible For Loan Relief
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Maharashtra Drought Supriya Sule Demands Complete Farm Loan Waiver and Direct Financial Relief for Farmers in Pandharpur
Marathi News Esakal
www.esakal.com