
काटेवाडी : पुणे जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ साठी पेरणीला चांगला वेग आला आहे. जिल्ह्यातील एकूण दोन लाख दोन हजार २,६३ हेक्टरपैकी ५५ हजार ३४६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच २७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. काही तालुक्यांमध्ये पेरणीने चांगली प्रगती दर्शवली आहे, तर काही ठिकाणी पेरणीचे प्रमाण कमी आहे.