
पुणे : दमदार पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या सध्या वेगात सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात ५५ टक्के पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. गतवर्षीच्या खरीप हंगामात एक लाख २२ हजार ४२७ हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. आता चालू हंगामात आत्तापर्यंत एक लाख ११ हजार ५९२ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत पेरण्यांचे प्रमाण कमी दिसत असले तरी उर्वरित पेरण्या पुढील महिनाभरात पूर्ण होण्याची कृषी विभागाला अपेक्षा आहे.