

पुणे, ता. २ : सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात विशेष मोहीम राबविली. या कारवाईत पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील २९ आस्थापनांची तपासणी करून सुमारे एक कोटी ४७ लाख १२ हजार ६७० रुपये किमतीचा तीन लाख ५३ हजार ३०७ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
प्रशासनाने २८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान तपासणी मोहीम राबविली. साताऱ्यातील मे. अमीन ट्रेडर्स येथून तांदूळ, डाळी, गूळ आणि इतर अन्नपदार्थांचा २०,५६० किलो साठा जप्त केला. तसेच, मे. स्वाती ऑईल मिल्स (सातारा) येथून ६,६७१ किलो खाद्यतेल आणि सोलापूरमधील मे. एस. जी. ट्रेडर्स येथून ६,२३५ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. पुणे मार्केट यार्ड परिसरातील मे. श्रीकांत मसालेवाले, मे. भन्साळी मेहता पेढी, मे. नकुल एंटरप्रायझेस, मे. महाराष्ट्र सेल्स, मे. ध्रुवी ॲग्रो आणि मे. गणेश रामचंद्र आपटे प्रा. लि. या आस्थापनांवरही कारवाई केली.
गंभीर त्रुटी आढळल्यामुळे पुणे विभागातील एका अन्न व्यावसायिकाचा परवाना निलंबित केला आहे. जप्त केलेल्या साठ्यामध्ये प्रामुख्याने खाद्यतेल, मसाले, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, नमकीन आणि सुक्या मेव्याचा समावेश आहे. कमी दर्जाचे किंवा भेसळयुक्त अन्न विकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. नागरिकांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.