

FDA Raid Pune
ESakal
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहराच्या मध्यवस्तीतील व्यावसायिकांकडे मोर्चा वळवला असून गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ भागात तपासणी करत मिठाईविक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत निकृष्ट अन्नपदार्थ वापरून तयार केलेली, अस्वच्छता तसेच विनापरवाना साठवून ठेवलेली मिठाई, कँडी, चॉकलेट आणि सुकामेवा मिळून सुमारे ५५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला.