

FDA officials inspect sweet shops and seize substandard food products ahead of Diwali in Pune
esakal
पुणे,: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील १० ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. यात नऊ लाख ३९ हजार रुपये किमतीचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. त्यापैकी सुमारे दीड हजार किलो निकृष्ट अन्नपदार्थ जागीच नष्ट करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही व्यावसायिकांचे परवाने निलंबित केले असून, काहींना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.