Pune Festival 2023 : पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘जाणता राजा’

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या सादरीकरणाने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
pune festival
pune festival sakal

पुणे - स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील थरारक प्रसंगांच्या नाट्यमय सादरीकरणातून शिवकाल उभा राहिला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या सादरीकरणाने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

पुणे फेस्टिव्हलअंतर्गत सोमवारी (ता. २५) हे महानाट्य सादर करण्यात आले. भारतीय कला वैभवतर्फे सूत्रधार म्हणून मंदार परळीकर यांनी कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये संस्थेचे १५० कलावंत सहभागी झाले होते. याचे दिग्दर्शन योगेश शिरोळे यांचे, साहित्य व कपडेपट आनंद जावडेकर यांचे आणि नेपथ्य महेश रांजणे यांचे होते. फेस्टिव्हलचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कलमाडी व त्यांच्या पत्नी मीरा कलमाडी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, फेस्टिवहलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड उपस्थित होते. तत्पूर्वी, फेस्टिव्हलच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘हास्यधारा’ हे मराठी कवीसंमेलन पार पडले. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर,

pune festival
Pune Festival 2023 : रसिकांनी अनुभवली सुरांची जादू

डॉ. महेश कोळुस्कर, नितीन देशमुख, नारायण पुरी, प्रशांत मोरे, अंजली कुलकर्णी, वैभव जोशी, हर्षदा सुखटणकर, प्रशांत केंदळे, भरत दौंडकर, नीलिमा मानगावे या कवींनी संमेलनात सहभाग घेतला. ज्येष्ठ कवी-वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या खुमासदार सूत्रसंचालकाने संमेलनाची रंगत अधिकच वाढवली. फेस्टिव्हलमध्ये ‘कविता प्रॉडक्शन, पुणे’ प्रस्तुत आणि पप्पू बंड निर्मित ‘लावणीचा खणखणाट व घुंगरांचा छनछनाट’ हा कार्यक्रमही सादर झाला.

pune festival
Pune Festival 2023 : मुशायरामध्ये शेरो-शायरीची मेजवानी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com