cp radhakrishnan
sakal
पुणे - कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य आणि क्रीडा यांचा संगम असणारा ३८ वा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात रंगणार आहे. महोत्सवाचे भव्य उद्घाटन शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी साडेचार वाजता स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा रंगमंचावर उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.