
PMC Update
Sakal
पुणे : पुणे शहरातील खड्ड्यांची माहिती नागरिकांकडून माहिती मिळावी आणि प्रशासनाकडून त्वरित त्याची दखल घेऊन कार्यवाही व्हावी यासाठी महापालिकेने ‘पीएमसी रोड मित्र’ ॲपवर सुरु केले आहे. गेल्या महिन्याभरात या ॲपवर १ हजार २७४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, यापैकी १ हजार १८९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागात खड्डे असून, तेथील रस्ते चांगले कधी होणार असा प्रश्न उपस्थित राहात आहे.