पुणे : अग्निशामक दलाच्या जवानांनी पेटता सिलेंडर वेळीच बाहेर काढला नाहीतर...

Pune Fire brigade officer control Fire on time at mangalwar peth
Pune Fire brigade officer control Fire on time at mangalwar peth

पुणे : वेळ सकाळी सव्वा अकरा वाजताची. मंगळवार पेठेतील छोट्याशा झोपडीत राहणारे, हातावर पोट असणारे कष्टकरी आंघोळ वगैरे आटोपुन दुपारचा स्वयंपाक करण्यात व्यस्त होते. तेवढ्यात सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक आग लागली. घरातील व्यक्ती घाबरुन बाहेर पळाले. तेवढ्यात कोणीतरी अग्निशामक दलाला खबर दिल्या, त्यानंतर अवघ्या काही मिनीटांतच कसबा अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचले, गल्लीबोळातून रस्ता काढत झोपडीपर्यंत पोचले, क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पेटता सिलेंडर व घरातील आग तत्काळ विझविली. जवानांना पोचायला काही मिनीटे उशीर झाला असता तर...! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंगावर शहारे उमटविणारी ही घटना मंगळवार पेठेतील जुना बाजार येथे मंगळवारी सकाळी घडली.झोपडपट्टीच्या अंतर्गत भागामध्ये एक छोटीशी झोपडी आहे. या झोपडीमध्ये उत्तर प्रदेशातील सात ते आठ कामगार एकत्र राहतात.शहरात मिळेल तिथे काम करुन स्वतःचा उदरनिर्वाह भागवितात. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी त्यांनी सकाळी उठून आंघोळ आटोपली. त्यानंतर त्यांच्यातील काहीजण स्वयंपाक करण्यासाठी भाजी निवडत बसले होते. तर एक तरुण गॅस पेटवून भाजीची तयारी करीत होता. त्याचवेळी सिलेंडरमधील गॅस गळती होऊन अचानक सिलेंडरने पेट घेतला. त्याबरोबर बांबु व पत्र्याचे शेडमध्ये असलेल्या वस्तुंनी पेट घेण्यास सुरूवात केली. या घटनेमुळे घाबरलेल्या कामगारांनी तेथून बाहेर पडण्यास प्राधान्य दिले. 

दरम्यान, तेथील तरुणांनी तत्काळ अग्निशामक दलाला याबाबत खबर दिली. अवघ्या काही मिनीटांवरच असलेल्या कसबा अग्निशामक दलाची गाडीही विनाविलंब घटनास्थळी दाखल झाली. मात्र झोपडी अंतर्गत भागात असल्यामुळे तेथे पोचणे अवघड होते. त्यामुळे तांडेल अनिल करडे यांच्या नेतृत्वाखालील फायरमन हरीश बुंदेले, विठ्ठल अडारी, ज्ञानेश्‍वर गायकवाड व चालक विलास धुमाळ यांनी तत्काळ पाण्याचा पाईप अंथरुन घटनास्थळापर्यंत पोचले. त्यानंतर पेटलेला सिलेंडर व बांबु, पत्र्यावर पाण्याचा मारा केला. त्यामुळे काही मिनीटातच आग विझली व मोठी दुर्घटना टळली. तसेच कामगारांचे मोठे नुकसानही टळले. 

पेशवेकाळापासूनचा पुण्यातील जुना बाजार कोरोनामुळे बंद; अनलॉकची प्रतीक्षा

अग्निशामक दलाच्या जवानांना पोचण्यास काही मिनीटे उशीर झाला असता तर सिलेंडरचा स्फोट होऊ कामगारांच्या झोपडीसह आजुबाजुच्या झोपड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. तसेच पाऊस व कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर अशी घटना घडली असती तर स्थानिक रहीवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असते. त्यामुळे स्थानिक नागरीकांनी अग्निशामक दलाच्या जवान वेळेत पोचवून त्यांनी आग विझविली, त्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ज्ञता व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com