पुणे : पाटील इस्टेट झोपडपट्टीत आग 

fire.jpg
fire.jpg

पुणे : संगमवाडीच्या परिसरातील पाटील इस्टेट झोपडपट्टीतील गल्ली क्रंमाक तीनमध्ये दुपारी एक ते दोनच्या दरम्यान आग लागली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी पोचल्या असून आगीवर नियत्रण मिळवले जात आहे. मात्र, आगीच्या ठिकाणी पोचण्यासाठी गाड्यांना अनेक अडथळे येत आहेत.

आगीचा जोर वाढत असून आसपासच्या झोपड्याही आगीमध्ये येत आहेत. जवळपास 50 पेक्षा अधिक झोपड्यांना आग लागली आहे. आगीच्या परिसरात उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित असून स्वतः नागरिकांना सूचना करता आहेत.

आग वाढतच असल्याने आसपासच्या झोपड्यातील लोकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे. झोपड्यातील गॅसचा स्फोटही होत असल्याने आगीमध्ये भर पडत आहे. तसेच घरातील वस्तूमुळे देखील आग वाढत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही आगीपर्यंत पोचत नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवता येत नाही. मात्र, अग्निशम दल आग विझविण्याचे प्रयत्न करत आहे. दरम्यान, आग लागलेल्या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. संचेती चौकाकडून वाकडेवाडीला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com