esakal | पुणे : झांबड लघुपटास प्रेक्षकांचा प्रथम प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

film

पुणे : झांबड लघुपटास प्रेक्षकांचा प्रथम प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मीती शॉर्ट फिल्म फेस्टिवल रविवारी रोजी नुकताच पार पडला, हा फेस्टिव्हल न्यु इंग्लिश स्कुल, टिळक रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एकूण ५४ लघुपट सहभागी झाले होते, झांबड लघुपटास प्रेक्षकांचा प्रथम प्रतिसाद मिळाला. ऊसतोड महिलांच्या आयुष्यावर 'झांबड' मधून प्रकाशझोत टाकला आहे. अतिशय अभ्यास पूर्ण व नेमक्या मोजक्या शब्दांत हा विषय मांडला आहे. कथा व पटकथा उत्तम आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन धनेश कुलकर्णी यांनी केले असून, निर्माते मयूर तातुस्कर, प्रेम सावन्त आणि प्रवीण वाघमारे आहेत.

film

film

फेस्टिव्हलला प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराजराजे भोसले व सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांची होती. झांबड चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे अभिनेता महेश पाटील व अभिनेत्री श्रद्धा गायकवाड यांचे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून कौतुक करण्यात आले.

loading image
go to top