मासळी, मटण अन् चिकनला मागणी वाढली

मासळी, मटण अन् 
चिकनला मागणी वाढली
Published on: 

मार्केट यार्ड, ता. २५ ः नवरात्रोत्सव संपल्यानंतर मांसाहार करण्यास पुणेकृर पसंती देत आहेत. त्यामुळे मासळी, मटण आणि चिकनला मागणी वाढली आहे. परिणामी, सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. तर मटणाच्या भावात किलोमागे ४० रुपये तेजी आहे. मागणी वाढली असली तरीही चिकनचे भाव मात्र स्थिर आहेत. उष्णता आणि दुष्काळाचा परिणाम पक्ष्यांच्या वाढीवर होत आहे. पक्ष्यांची वाढ होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे आता चिकनचे भाव स्थिर असले, तरीही येत्या काळात चिकनच्या भावात वाढ होण्याची शक्यता चिकनचे व्यापारी रुपेश परदेशी यांनी वर्तविली. गावरान अंड्याचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. तर इंग्लिश अंड्याच्या भावात शेकड्यामागे ३० रुपयांनी वाढ झाली. तरीही इंग्लिश अंड्याचे डझन आणि नगाचे भाव स्थिर आहेत.
गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीच्या मासळीची २०० ते ४०० किलो आणि नदीच्या मासळीची २०० ते ४०० किलो इतकी आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून १० ते १५ टन आवक झाल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तर मटणाची माहिती मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली. खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) - पापलेट : कापरी : १८००-२२००, मोठे : १५००-१८००, मध्यम : १२००-१५००, लहान : ९००-१०००, भिला : ५००-७००, हलवा : ६००-७००, सुरमई : ५००-८००, रावस : ८००-९००, घोळ : ६००-८००, करली : ३००-४००, भिंग : ४००-५००, पाला : लहान : ६००-७०० मोठा : १२००-१५००, वाम : पिवळी ६००-८००, काळी : ३००-४००, ओले बोंबील : १००-२००. कोळंबी : लहान : १५०-२४०, मध्यम : ३५०-४८०, मोठी : ६००-८००, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : १५०-२००, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : ३००-३५०, चिंबोऱ्या : ६००-८००. खाडीची मासळी - सौंदाळे : २४०-२८०, खापी : २००-२४०, नगली : ३००-४००, तांबोशी : ४००-५००, पालू : २००-२४०, लेपा : २००-२४०, बांगडा : १८०-२४०, शेवटे : २००-२४०, बेळुंजी : १२०-१८०, तिसऱ्या : २५०-३००, खुबे : १२०-१६०, तारली : २००-२४० नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १८०-२२०, मरळ : ३५०-४००, शिवडा : १८०-२००, खवली : १८०-२००, आम्ळी : ८०-१४०, खेकडे : २५०-३००, वाम : ४००-४५०. मटण : बोकडाचे ८८०, बोलाईचे ८८०, खिमा ८८०, कलेजी ९२०. चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १७०, बोनलेस ३५०. अंडी : गावरान (शेकडा) १२१० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ६३०, डझन ८४, प्रतिनग ७.००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com