पुण्यात पाणीच पाणी; रस्ते तुंबले, घरातही पाणी

Pune Floods Roads are full due water even houses are flooded
Pune Floods Roads are full due water even houses are flooded
Updated on

हडपसर (पुणे) : परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक सुखावले असले तरी महापालिका प्रशासनाचा फोलपणा या पहिल्या पावसात उघड झाला आहे. अनेक भागांत पाणी साचले आहे, तर पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचेही तीनतेरा वाजले. महापालिकेने शहरात शंभर टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता, मात्र या पावसाने त्यांचा हा दावा खोटा असल्याचे दाखवून दिले. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज वितरण व्यवस्थाही कोलमडली असून काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे.
---------
भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के
---------
तिबेटमध्ये चीनचा युद्धसराव; पडद्यामागे चीन चाललंय काय?
---------
पहिल्याच पावसामुळे सोलापूर रस्ता, ससाणेनगर रस्ता, रविदर्शन सोसायटी चौक, डि मार्ट रस्ता, माळवाडी, वानवडी येथील फातीमानगर चौक, कै. विठठलराव शिवरकर रस्ता आदी रस्त्यांवर प्रचंड पाणी साचल्याने नागरिक आणि वाहनचालकांना अक्षरशः रस्ते शोधावे लागले. पावसाळी गटारे तुंबल्याने परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याची पंरपरा यंदाही कायम राहिल्याचे चित्र पहायला मिळाले. 

ससाणेनगर येथील श्रावणधारा सोसायटीत ग्लायडिंग सेंटरमधून मोठया प्रमाणात पाणी आले. हे पाणी अनेक घरांमध्ये घुसल्याची तक्रार नागरिक प्राचार्य लहू वाघुले यांनी केली. महापालिकेने पावसाळी कामे खरेच केली आहेत का, असा प्रश्नही उभा ठाकला आहे. ती केली असतील तर त्यावरील लाखो रूपयांचा खर्च या पावसात बुडाला असेच म्हणावे लागेल.

हडपसर अॅक्युरेट गेजींग कंपनीचे मॅनेजीक डायरेक्टर विक्रम साळुंखे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून आमच्या कंपनीत पाणी शिरत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठया प्रमाणात बांधकामातून निघणारा राडारोडा अनअधिकृतपणे टाकला जात आहे. त्यामुळे हि समस्या निर्माण झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com