
मार्केट यार्ड : श्रावण महिन्यामुळे पूजा, हार तसेच मंदिरांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांना मागणी वाढली आहे. पूजेसाठी पांढऱ्या फुलांना अधिकची मागणी आहे. मात्र सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे बाजारात येणाऱ्या फुलांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त फुले ओली येत आहेत. चांगल्या प्रतीच्या फुलांची आवक कमी होत असल्याने झेंडू, शेवंती आणि गुलछडीच्या फुलांच्या भावात वाढ झाली.