

Pune district administration steps up fodder cultivation and storage preparations to prevent a shortage for livestock.
esakal
पुणे : संभाव्य चाराटंचाईचे संकट निर्माण होण्यापूर्वीच त्यावर मात करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात २५ हजार एकर क्षेत्रावर चारा लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी मका आणि कडवळ या चारा पिकांच्या २२० टन बियाण्यांपैकी आतापर्यंत ८० टक्के बियाण्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित बियाण्यांचे वितरणही पुढील आठवडाभरात करण्यात येणार आहे.