

Pune
esakal
पुणे: नवीन मोटार घेतल्यानंतर वाटलेल्या पेढ्यांतून सात जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी चार वाजता वडगाव शेरीत घडला. यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित दुकानातून पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.