

पुणे, ता. १७ ः मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थांची अधिकृत विल्हेवाट लावण्याऐवजी ते हेराफेरी करत पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणले जात असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यातील अन्नपदार्थ साठवणूक करणाऱ्या दोन गोदामांवर कारवाई केली. चाकण येथील रिलायन्स रिटेल लिमिटेड आणि खेड तालुक्यातील निघोजे येथील ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे अन्नसुरक्षा परवाने निलंबित केले.
‘एफडीए’ने १४ ऑक्टोबरला चाकण, निघोजे येथील गोदामांची तपासणी केली. या वेळी अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, शीतसाखळी आणि मुदतबाह्य मालाच्या विल्हेवाटीशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्या. मुदतबाह्य आणि खराब झालेल्या अन्नपदार्थांची विल्हेवाट लावल्याचे पडताळता येतील असे पुरावे कंपन्यांना सादर करता आले नाहीत.
खराब उत्पादने आढळली
चाकण येथील रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या गोदामात उंदरांची विष्ठा, मुदतबाह्य आणि खराब उत्पादने एकत्र ठेवलेली आढळली. काही ठिकाणी झुरळांचा प्रादुर्भाव होता. कर्मचाऱ्यांकडून आवारात थुंकले जात असल्याचेही तपासणीत समोर आले. विल्हेवाट कंत्राटदारासोबतचा करार सादर करण्यात आला; मात्र मालाची प्रत्यक्ष विल्हेवाट लावल्याचे पडताळता येणारे पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे परवाना निलंबित करण्यात आला.
मुदतबाह्य मालाच्या विल्हेवाटीचा घोळ
निघोजे येथील ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामात शीतगृहाचे तापमान पाच अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. शीतसाखळीच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. ५० किलो टाटा मीठ आणि ६० किलो रवा थेट जमिनीवर ठेवला होता. गळती असलेली पाकिटे, झुरळांचा प्रादुर्भावही आढळला. सुमारे ६०० कर्मचाऱ्यांपैकी केवळ पाच जणांकडे अन्नसुरक्षा प्रशिक्षण पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे होती. मुदतबाह्य मालाच्या विल्हेवाटीचे पुरावे सादर न केल्याने या गोदामाचा परवानाही १५ ऑक्टोबरला निलंबित करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.