Pune Food Scandal Sakal
पुणे
Pune News : सूपमध्ये आढळले झुरळ; कॅफेच्या बनमस्कामध्ये काच, कॅम्प आणि डेक्कनमधील प्रकार
Food Safety Issue : पुण्यातील दोन नामांकित हॉटेल व कॅफेमधील अन्नात झुरळ व काच सापडल्याने ग्राहकांच्या आरोग्याशी होणाऱ्या धोक्याबद्दल संताप व्यक्त.
पुणे : शहरातील दोन वेगवेगळ्या नामांकित हॉटेल आणि कॅफेमधील अन्नपदार्थांमध्ये सापडलेल्या झुरळ व काचेमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याच्या दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत. कॅम्पमधील एका हॉटेलच्या सूपमध्ये झुरळ आढळले तर, दुसऱ्या प्रकरणात डेक्कन येथील प्रसिद्ध कॅफेच्या बनमस्कात काचेचे तुकडे सापडल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे.