

Pune Footpath Tender
esakal
पुणे : शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. त्यातच पादचारी मार्गाच्या दुरुस्तीसाठी ८८ कोटी रुपयांची निविदा काढली जात आहे. पण यासाठी केवळ सात दिवसांचाच कालावधी दिला आहे. ठरावीक ठेकेदारांना हे काम मिळावे, यासाठी सगळा घाट घातला असून, ही निविदा रद्द करावी, अशी मागणी आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे.