esakal | बेकायदा ‘सॉ मिल्स’आरागिरणीवर पुणे वनविभागाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

pune

बेकायदा ‘सॉ मिल्स’आरागिरणीवर पुणे वनविभागाची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : खराडीतील तुकारामनगर येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आरागिरणीवर (सॉ मिल्स) पुणे वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १) वन विभागाला या बेकायदा आरागिरणीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पुण्याचे सहाय्यक वनसंरक्षक, वडगाव मावळ येथील वन परिक्षेत्र अधिकारी व इतर वनकर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

कारवाई करण्यात आलेल्या आरागिरणीमध्ये अशोक खाशाबा जाधव यांचे रोहित पॅकेजिंग, सुनील भास्कर निकम यांचे महाराष्ट्र पॅकेजिंग (पाटील बॉक्स) आणि भावनाजी रावजी पटेल यांच्या लक्ष्मी टिंबर यांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये एकूण सहा आरा मशिन वनविभागाकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वडगाव मावळ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव तसेच पुणे, वडगाव मावळ, शिरोता व पौड वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनकर्मचारी व स्थानिक पोलिस प्रशासनाच्या मदतीने पार पडली. दरम्यान या प्रकरणात भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास चालू असल्याची माहिती वन विभागाने दिली.

loading image
go to top