

The Economic and Cyber Crime Wing is continuing its investigation to trace the remaining accused in the case.
पुणे : जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल ८८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेला एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी या कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन राठोड याला संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले असून, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.