pune fraud news
esakal
पुणे
Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर
spiritual fraud News In Marathi: शंकर महाराजांच्या नावाखाली १४ कोटींची फसवणूक करण्यात आली; पुण्यातील कुटुंबाची धक्कादायक कहाणी
पुण्यात कोथरुड परिसरातील एका कुटुंबाची शंकर महाराजांच्या नावाने १४ कोटी रूपयांची अफाट फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित दांपत्याने पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिलेल्या तक्रारीत हे प्रकरण सविस्तर मांडले आहे. कौटुंबिक अडचणी दूर होतील, मुलींचे आजार बरे होतील या भूलथापांना बळी पडून हे दांपत्य परदेशातील घर, शेती आणि सोन्यावर कर्ज काढून लुबाडले गेले. पती-पत्नी आणि इतरांनी मिळून ही आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

