
Fursungi Nagar Parishad Election
Sakal
पुणे : पुणे महापालिकेतून बाहेर पडून फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांची नगर परिषद स्थापन झाली आहे. तेथील पहिली सार्वत्रिक निवडणूक पुढील काही आठवड्यात पार पडण्यासाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत हे कर्मचारी तेथे पूर्णवेळ काम करणार आहेत.